नवीमुंबईला कोरोनाचा विळखा : एकाच दिवशी कोरोनाचे ४७ रुग्ण - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नवीमुंबईला कोरोनाचा विळखा : एकाच दिवशी कोरोनाचे ४७ रुग्ण

 नवीमुंबईला कोरोनाचा विळखा                     

  एकाच दिवशी कोरोनाचे ४७ रुग्ण .


नवीमुंबई  : प्रतिनिधी

  लढवय्या रोखठोक  


नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कॊरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून नवीमुंबई परिसर कोरोनाच्या विळख्यात सापडत चालल्याचे दिसून येत आहे आज नवीमुंबई महानगरपालिका हद्दीत तब्बल ४७ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 त्यामुळे नवीमुंबई महानगरपालिकेचा कोरोना चा आकडा आता जवळपास ४०० च्या जवळपास पोहचत आला आहे.
 नेरुळ , १४ वाशी ७ , तुर्भे ५ ,कोपरखैरणे  ०७, घणसोली-८, ऐरोली ४ , दिघा २ असे एकूण ४७ रुग्णांची नोंद झाली आहे.
  सेक्टर १४ कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या ३५ वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यांना २ मे रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्वॅब टेस्ट करून घेतली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
   सेक्टर ५ कोपरखैरणे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमधील ५७ वर्षीय व्यापारी व त्यांची ४७ वर्षीय पत्नी अशा २ व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांना ताप येऊ लागल्याने त्यांची स्वेब टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
तसेच सेक्टर १० ए वाशी येथील रहिवाशी असलेल्या मुंबई येथील रे रोड याठिकाणी ग्रोसरी शॉप असणा-या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वब तपासणीमधून त्यांच्या ६१ वर्षीय पत्नी, २८ वर्षीय सून, ३२ वर्षीय मुलगा, २२ वर्षीय पुतण्या व ३ वर्षाची नात अशा ५ व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
त्याच प्रमाणे सेक्टर ५ सानपाडा येथील ३५ वर्षीय पती व २८ वर्षीय पत्नी अशा २ व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. २९ एप्रिल रोजी पतीला ताप येऊ लागल्याने या दोघांनी स्वब टेस्ट करून घेतली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
  सेक्टर ४ सानपाडा येथील रहिवाशी व ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कॉन्स्टेबल यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांच्या १३ वर्षीय पुतण्याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
 सेक्टर ५ सानपाडा येथील रहिवाशी व मुंबईतील हिंदूजा रुणालयामध्ये वॉर्डबॉय म्हणून कार्यरत असणा-या २५ वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. ३० एप्रिल रोजी ताप येईपर्यंत ते कामाला जात होते. त्यांची स्वब टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.
 बाली नगर दिघा येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केट येथे कॅश काऊंटर वर कार्यरत असणा-या ४२ वर्षीय व्यक्तीचे युवकाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
 समता नगर ऐरोली येथे रहिवाशी असणा-या व सायन हॉस्पिटल मुंबई येथे आया पदावर काम करणा-या कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तीच्या स्वब तपासणीमधून त्यांच्या शेजारी २२ वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
 गणेश नगर चिंचपाडा ऐरोली येथील रहिवाशी व डिव्हाईन हॉस्पिटल ठाणे येथील ५१ वर्षीय वॉर्डबॉय यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत,  कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आल्याने व १ मे रोजी ताप येऊ लागल्याने त्यांनी स्वॅब टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.त्याचप्रमाणे चिंचपाड़ा ऐरोली येथील रहिवाशी व मुलुड मुंबई येथे रुग्णवाहिका चालविणा-या ४९ वर्षीय चालकाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
 सेक्टर १५ नेरुळ येथील रहिवाशी असणा-या व मुंबईतील वृत्तचित्रवाहिनी पॉझिटिव्ह कॅमेरामनच्या संपर्कात आलेल्या पॉझिटिव्ह कॅमेरामनच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वब तपासणीमधून त्यांच्या ६५ वर्षीय आईचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत,सेक्टर २८ वाशी येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. दाणा मार्केट येथील ६० वर्षीय ब्रोकर यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ए.पी.एम.सी. मार्केटमधील कोरोना तपासणी कक्षात लक्षणे आढळल्याने त्यांची स्वॅब टेस्ट करून घेण्यात आलेली होती. तसेच कोपरीगांव  येथील रहिवाशी असणा-या २२ वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
सेक्टर २६ वाशी येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. दाणा मार्केटमधील पॉझिटिव्ह सेल्समनच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांच्या ६० वर्षीय वडिलाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत,
    सेक्टर ५ घणसोली येथील रहिवाशी व मुंबई गोरेगांव येथील महानंदा डेरीत कार्यरत पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वब तपासणीमधून त्यांच्या ३९ वर्षीय पत्नी, १३ वर्षीय मुलगा व मुलगी, ७८ वर्षीय वडील आणि ६७ वर्षीय आई अशा ५ व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
 सेक्टर ५ घणसोली येथील रहिवाशी ५५ वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
 त्यांच्यावर डायरियाचे उपचार सुरु असताना त्यांची स्वॅब टेस्ट केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
 सेक्टर ३ घणसोली येथील रहिवाशी ३६ वर्षीय गरोदर महिला नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेली असता तिची स्वॅब टेस्ट करण्यात आली त्यामध्ये सदर महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
 घणसोली चिंचआळी येथील ४५ वर्षीय महिलेस ३ मे रोजी ताप व कफ अशी लक्षणे आढळल्याने स्वब टेस्ट करुन घेतली असता कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
 सेक्टर ११ कोपरखैरणे येथील ए.पी.एम.सी. दाणा मार्केटमधील पॉझिटिव्ह अकाऊंटंटच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वब तपासणीमधून त्यांच्या ५५ वर्षीय वडीलांचे, ५० वर्षीय आईचे, ३१ वर्षीय पत्नीचे व २४ वर्षीय बहिणीचे अशा ४ व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
   सेक्टर ६ सारसोळे नेरूळ येथील रहिवाशी व मुंबईत बी.पी.टी, फोर्ट येथील ५५ वर्षीय कर्मचारी यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत,
 सेक्टर २४ जुईनगर नेरुळ येथील पॉझिटव्ह मृत व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वब तपासणीमधून त्यांच्या ५२ वर्षीय पत्नी, २१ व २४ वर्षीय २ मुली आणि १५ वर्षीय मुलगा तसेच ३१ वर्षीय शेजारी पुरुष व २९ वर्षीय शेजारी महिला अशा ६ व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत,
 सेक्टर ६ शिरवणे नेरूळ येथील रहिवाशी व मुंबईतील पॉझिटिव्ह पोलीस कॉन्टेबलच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वब तपासणीमधून त्यांच्या २५ वर्षीय मुलाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
 सेक्टर २३ जुईनगर येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमध्ये कामगार असणा-या ३५ वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत,
 सेक्टर २३ जुईनगर येथील रहिवाशी व मुंबईतील चेंबूर नाका पोलीस ठाणे येथे कार्यरत ४८ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल आणि त्यांचा १८ वर्षाचा मुलगा अशा २ व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
 त्यांना जॉय हॉस्पिटल चेंबूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे.
 सेक्टर २४ जुईनगर येथील रहिवाशी व मुंबई येथे बी.ई.एस.टी, कुलाबा डेपोत इलेक्ट्रीशियन म्हणून कार्यरत असणा-या ५६ वर्षीय व्यक्तीचे व त्यांच्या २२ वर्षीय मुलगा अशा २ व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
सेक्टर २० ऐरोली येथील पॉझिटिव्ह महिलेच्या डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल वाशी याठिकाणी झालेल्या प्रसुतीनंतर तिच्या बाळाची स्वॅब टेस्ट घेतली असता तिचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
  रामनगर दिघा येथील रहिवाशी व मुंबईतील ग्रैटरोड येथील कार्यालयात संगणक ऑपरेटर असणा-या व्यक्तीस १ मे रोजी श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाल्याने दिघा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मधुमेह वाढल्याने त्यांस ठाण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी त्यांची कोरोना टेस्ट केली असता कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना ४ मे रोजी रात्री १२ वाजता ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले व ते ५ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
सेक्टर २० ऐरोली येथील पॉझिटिव्ह महिलेच्या डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल वाशी याठिकाणी झालेल्या प्रसुतीनंतर तिच्या बाळाची स्वॅब टेस्ट घेतली असता तिचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
  रामनगर दिघा येथील रहिवाशी व मुंबईतील ग्रैटरोड येथील कार्यालयात संगणक ऑपरेटर असणा-या व्यक्तीस १ मे रोजी श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाल्याने दिघा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मधुमेह वाढल्याने त्यांस ठाण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी त्यांची कोरोना टेस्ट केली असता कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना ४ मे रोजी रात्री १२ वाजता ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले व ते ५ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0