पनवेलमध्ये कोरोनाचा हाहाकार
एकाच दिवशी १२ रुग्ण आढळले.
पनवेल ; लढवय्या रोखठोकपनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे , त्यामुळे पनवेल परिसरातील नागरिकांमध्ये भितीची लाट पसरली असतानाच आज तब्बल कोरोनाचे १२ रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाने दिली आहे .
यामध्ये कामोठे , नवीन पनवेल , खारघर व कळंबोलीतील नागरिकांचा समावेश आहे.
कामोठे सेक्टर-२१ येथील ५६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच कामोठे सेक्टर-१० येथील एकाच कुटुंबातील २१ वर्षीय व १३ वर्षीय असे २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर व्यक्तीची आई यापूर्वो कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तीना त्यांच्या आईपासूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
(आई व्ही.एन.देसाई हॉस्पीटल, मुंबई येथे सफाई संविका म्हणून कार्यरत आहे.) त्याच प्रमाणे नविन पनवेल सेक्टर-१३ येथील २१ वर्षीय व १७ वर्षीय अशा २ मुली तसेच ४५ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. हे सर्व एकाच कुटुंबातील असून यापूर्वी त्यांचे कुटुंब प्रमुख हे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून यापूर्वी ते कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले होते. त्यांच्यापासूनच त्यांच्या पत्नीला व मुलींना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-९ येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे. ही व्यक्ती सायन हॉस्पीटल, मुंबई येथे MRI टेक्नीशन म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच
खारघर ओवे सेक्टर-३५ येथील २२ वर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
ही व्यक्ती मॅजेस्टीक ग्रुप ऑफ कंपनीज, कोपरखैरणे मध्ये कार्यरत आहे. या व्यक्तीचे कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या कुटुंबातील इतर ३ सदस्य हे कोपरखोरणे येथे राहत असून यापूर्वीच कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेले आहेत. त्यांच्यापासूनच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कळंबोली येथील आई आणि मुलगा अशा २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. हया दोन्ही व्यक्ती यापुर्वी पॉझिटिव्ह आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरातील आहेत
त्याच प्रमाणे खारघर स्वप्नपुर्ती येथील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे .
नविन पनवेल सेक्टर-६ येथील ४९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती रिलायन्स कंपनी, घनसोली येथे कस्टम मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.