पनवेलमध्ये कोरोनाचा धुमाकूळ
एकाच दिवशी १७ रुग्ण आढळले
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल परिसरात कोरोना ने आता अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या आकडेवारीमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जाते असतानाच आज पनवेल महानगरपालिका परिसरात तब्बल कोरोना चे १७ रुग्ण आढळले असून चिंतादायक परिस्थिती पनवेल मध्ये निर्माण झालेली आहे या १७ रुग्णांमध्ये
पनवेल , खारघर , कळंबोली , कामोठे शहरांचा समावेश आहे .
पनवेल महानगरपालिका त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून वेळोवेळी योग्य अशी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत तरीदेखील झपाट्याने वाढणारे संख्या पाहता परिसर आता चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
नविन पनवेल सेक्टर-४ पुष्पमाला सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्यांच्या घरातील एक व्यक्ती APMC मार्केट, वाशी येथे कार्यरत असून तो याआधी कोविड १९ पोसिटीव्ह आलेला होता. त्याच्या संपर्कात येऊनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-६, संगम सरीता सोसायटी मधील गंगा अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कॉव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती याअगोदरच कोविड-१९ पोसिटीव्ह आलेला होता. त्याच्या संपर्कात येऊनच या तिघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-६ शितलधारा कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्यांच्या घरातील कुटुंब प्रमुख वडाळा बस डेपोमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत असून तो याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिन आलेला होता. त्याच्या संपर्कात येऊनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-११ आशियाना कॉम्प्लेक्स येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती कॅन्सर आजारावर उपचार घेण्याकरीता वारंवार जन हॉस्पीटल, चेबूर येथे जात होती. सदर हॉस्पीटलमध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पनवेल तुलसीधाम सोसायटी येथील ४९ वर्षोय १ महिला कोव्हिड१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला मिनाताई ठाकरे हॉस्पीटल, नेरूळ येथे स्टाफनर्स म्हणून कार्यरत आहे. त्यांना हॉस्पीटलमध्येच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच पनवेल, प्लॉट नं.४५, परमेश्वरी निवास, ५२ बंगलो येथील ४८ वर्षीय १ महिला कोविड-१९ पॉझिटिक आलेली आहे. ही महिला NMMC हॉस्पीटलमध्ये स्टाफनर्स म्हणून कार्यरत आहे. त्यांना सदर हॉस्पीटलमध्येच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
नविन पनवेल सेक्टर-१६. पोदी नं.२ येथील ५० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. ही व्यक्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
त्याच प्रमाणे खारघर सेक्टर-३५ई जयानी बिल्डिंग येथील २५ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेच्या कुटुंबातील तीन व्यक्ती याआधी कोकिङ-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत. त्यांच्या संपर्कात येऊनच हया महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-११ येथील ५७ वर्षोय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला मसोना हॉस्पीटल, भायखळा. मुंबई येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर हॉस्पीटलमध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
पनवेल पारिजात सोसायटी, उरणनाका येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे. सदर व्यक्ती TCS कंपनी, ठाणे येथे कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खारघर घरकुल, सेक्टर-१५ येथील ५० वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे. सदर महिला किडनीच्या आजारावर उपचार घेण्याकरीता डी.वाय हॉस्पीटल, नेरुळ येथे अगोदर पासुनच दाखल आहे. सदर हॉस्पीटलमध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कळंबोली सेक्टर-३ई येथील ५८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती बेस्ट डेपो, गोवंडी येथे कन्डक्टर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-३५ संकल्प सोसायटी येथील २६ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती धारावी, मुंबई येथे बेस्ट बस ड्रायव्र असून ते याआधीच काव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्या संपर्कात येऊनच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.