महाड गटविकास अधिकाऱ्यांचा वाढदिवस धुमधडाक्यात : पंचायतसमिती कार्यालयात मटणावर ताव
लढवय्या रोखठोक : रायगड
देशावर व राज्यावर कॊरोना विषाणूचे महाभयंकर संकट ओढवले असताना महाड पंचायत समितीच्या सभापती कार्यालयात गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांच्या वाढदिवसानिमित्त मटणाची जंगी पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे महाड परिसरातील आज कोरोनामुळे एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना महाड पंचायत समितीतील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या कॊरोना विषाणू चे कोणतेही गांभीर्य नसल्याने सर्व नियम धाब्यावर बसवून जंगी वाढदिवस साजरा केला आहे .
या सर्व प्रकाराबाबत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी संबंधित घटना निंदनीय असून कोणत्या प्रकारचे गांभीर्य संबंधितांना उरले नाही असं या प्रकारानंतर दिसत आहे असे म्हणाले . तसेच तपास करून कोणालाही पाठीशी न घालता गंभीर कारवाई केली जाणार असल्याचे लढवय्या रोखठोकशी बोलताना सांगितले .