कळंबोलीकरांना मॉर्निंगवॉक अत्यावश्यक ! ; नवीमुंबई पोलिसांकडून ५६ जणांवर कारवाई - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीकरांना मॉर्निंगवॉक अत्यावश्यक ! ; नवीमुंबई पोलिसांकडून ५६ जणांवर कारवाई

कळंबोलीकरांना मॉर्निंगवॉक अत्यावश्यक !
 नवीमुंबई पोलिसांकडून ५६ जणांवर कारवाई

कळंबोली : प्रतिनिधी



देशभरासह राज्यात कोरोना च्या भयंकर विषाणूचे पडसाद उमटत आहेत या भयंकर विषाणूमुळे जगभरात हजारो बळी गेलेले आहेत , मात्र अजून काही नागरिक यासर्व प्रकाराकडे कानाडोळा करून रस्त्यांवर  फिरताना दिसत आहेत .
 कळंबोली पोलीस यांच्यामार्फत काल  मॉर्निंगवॉक साठी बाहेर पडणाऱ्या जवळपास ३५ जणांवर कारवाई केल्यानंतर देखील कळंबोली शहरात मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंगवॉक साठी बाहेर पडताना दिसत आहेत .
नवीमुंबई पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार  पोलीस उपायुक्त परिमंडळ २ यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली हद्दीत
विशेष पथकाने आज सकाळी मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडलेल्या तब्बल ५६ लोकांवर पुन्हा कारवाई केली आहे , यांच्यावर
 संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम आयपीसी १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये ५३ पुरुष व ३ महिलांचा समावेश आहे .
 कळंबोली शहरात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने कळंबोलीतील सेक्टर ४ हा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे .
 एवढी ताजी घटना असताना देखील कळंबोली मधील नागरिक मोठ्या संख्येने कोणत्याही प्रकारचे गांभीर्य लक्षात न घेता मॉर्निंगवॉक साठी रस्त्यांवर गर्दी करत असल्याचे निष्पन्न होत आहे  .
  नागरिकांनी कोरोना विषाणू बाबत गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःची व इतरांची काळजी घ्या असे आव्हान कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0