कॊरोना बाबत सोशल मिडियावर जनजागृती : कोकणातील कलाकारांचे समाजप्रबोधन - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कॊरोना बाबत सोशल मिडियावर जनजागृती : कोकणातील कलाकारांचे समाजप्रबोधन


  कॊरोना बाबत सोशल मिडियावर जनजागृती

    कोकणातील कलाकारांचे समाजप्रबोधन


कणकवली : प्रतिनिधी 

  लढवय्या रोखठोक     


सध्या कोरोना या महाभयंकर रोगाने आज जग त्रस्त आहे.भारतात ही याचा प्रसार झपाट्याने होत आहे.यासाठी वैद्यकीय यंत्रणा आपले कौशल्य पणाला लावत आहे.एवढेच नाही तर पोलिस,डॉक्टर,स्वछतादूत आणि प्रशासन यांच्या माध्यमातून देशाला या कोरोना च्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.   या सगळ्यामध्ये समाजप्रबोधनाकरिता एक खारीचा वाटा म्हणून सोशल मीडिया च्या आधारे लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील 'स्नेहांश एंटरटेनमेंट'या क्रिएटिव्ह ग्रुप च्या माध्यमातून योगदान देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. " हरकत काय हा ?" या विषयावर असलेली चित्रफीत सोशल मिडियावर सध्या व्हायरल झाली आहे .
नागरिकांनी घरातच बसा यासाठी प्रशासन आवाहन करत आहे . तरी सुद्धा लोक कोणत्या ना कोणत्या शुल्लक कारणाने बाहेर पडत आहेत . या चित्रफितीतून अशा लोकांना योग्य असा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 
 याची संकल्पना प्रा.शेखर गवस यांची असून त्याला  प्रा.सिद्धेश खटावकर यांच्या लेखणीतून तसेच स्वप्निल राणे यांच्या छायाचित्रण संकलनाच्या माध्यमातून कणकवलीतील हरहुन्नरी कलाकारांनी घरबसल्या आपल्या अभिनयाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृतीचा एक वेगळाच साज चढवला आहे.यामध्ये सत्यवान गावकर,पूजा राणे,सिद्धेश खटावकर, सुशील डवर,श्रद्धा परब,शेखर गवस,प्रमोद तांबे,शरद सावंत, साहिल राणे आणि दिपकजी परब यांनी अभिनय कौशल्यातून परिणामकारकरित्या संदेश पोहचवला आहे.
 सदर व्हिडीओ हा वर्क फ्रॉम होम या सदराखाली करण्यात आलेला  आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0