पनवेल परिसरात आज ३ कोरोना बधितरुग्णांची नोंद :
पोलीस कर्मचाऱ्याचा कॊरोनामूळे बळी
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल परिसरात आज ३ नव्याने करुणा ग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली असून . कामोठे येथील एका पोलीस कर्मचाऱ्यांना कॊरोना मुळे दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे . सदर पोलीस कर्मचारी यांना अगोदरपासूनच कॅन्सर आजाराचा देखील त्रास होता .
आज कामोठे येथील ५१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती मुंबईमध्ये बेस्ट ड्रायव्हर आहे.
त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
आज पनवेल येथील ५० वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. हया राजेवाडी, मुंबई येथे स्टाफ नर्स आहेत. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच खारघर येथील ४३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती मुंबईमध्ये सी.ए. म्हणून काम
करीत आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे येथील महाराष्ट्र पोलिस दलातील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती.