पनवेलकारांच्या चिंतेत वाढ : कोरोनाचे ५ नवे रुग्ण आढळले. - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलकारांच्या चिंतेत वाढ : कोरोनाचे ५ नवे रुग्ण आढळले.

  पनवेलकारांच्या चिंतेत वाढ
कोरोनाचे ५ नवे रुग्ण आढळले.
पनवेल : लढवय्या रोखठोक



पनवेल महानगरपालिका हद्दीतील आज पुन्हा ५ नवीन कॊरोना बाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. दिवसेंदिवस पनवेल महापालिका क्षेत्रात कॊरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे .
  आज खारघर सेक्टर-४ येथील ३३ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांचे पती याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आढळलेली होती. सदर महिलेला त्यांच्या पतीपासूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच
 नविन पनवेल सेक्टर-९ मधील ५४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीला मेडिकल शॉपमधून
ओषधे आणताना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. संबंधित मेडिकल शॉपमधील सर्व कामगारांच्या तपासण्या सुरू आहेत.
त्याचप्रमाणे कामोठे सेक्टर-११ येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका येथे
सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  कामोठे सेक्टर-२१ येथील ३७ वर्षीय १व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती गोवंडी. मुंबई येथील फार्मा कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्ती कामोठे ते गोवंडी असा बस प्रवास करीत असल्याने त्यांना प्रवासादरम्यान संसर्ग
झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच कामोठे सेक्टर-२१ येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती टाटा कॅन्सर हॉस्पीटल, मुंबई येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0