पनवेल महानगरपालिका परिसरात आज तब्बल ७ कॊरोनाचे नवीन रुग्ण
लढवय्या रोखठोक
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका परिसरात आज तब्बल ७ कॊरोनाचे नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली
आहे .त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरेल आहे . तर एक रुग्ण बरा झाला आहे .
#आजच्या आढळलेल्या रुग्णाबाबत अधिक माहिती#
आज कळंबोली सेक्टर-४ येथील ३३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती वडाळा, मुंबई येथे पोलिस
कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच कामोठे सेक्टर-७ येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये
सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संक्रमण झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच खारघर सेक्टर-४ येथील ६७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती जेष्ठ नागरिक असून उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे अॅडमीट आहे. हया व्यक्तीचा मुलगा याअगोदरच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आला असून तो दिनांक
२४/०४/२०२० पासून उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे उपचार घेत आहे. सदर व्यक्तीला मुलाकडूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खारघर सेक्टर-४ येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती इस्टेट एजंट म्हणन काम करीत आहे. सदर व्यक्तीचा भाऊ याअगोदरच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आला असून तो दिनांक २४/०४/२०२० पासून उपजिल्हा रूग्णालय, पनवेल
येथे उपचार घेत आहे. सदर व्यक्तीला त्याच्या भावाकडूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खारघर सेक्टर-१२ येथील ३८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती वडाळा, मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्याच प्रमाणे
खारघर येथील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती मित्र हॉस्पीटल, खारघर येथे X-ray टेक्नीशन म्हणून काम करीत आहे. ही व्यक्ती मुळची गोवंडी येथील असून कामानिमित्त गोवंडी ते खारघर असा प्रवास करीत होती. सदर व्यक्तीला प्रवासादरम्यान संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच कामोठे सेक्टर-२० येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती बहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संक्रमण झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
त्यामुळे सर्वांनी स्वतःची व दुसऱ्याची काळजी घ्यावी व घराबाहेर पडू नये असे आवाहन पनवेल महानगर पालिकेच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.
त्याच प्रमाणे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, मुंबई येथे कार्यरत असलेल्या १ डॉक्टर महिला याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांची
कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी नेगेटिव्ह आली असून त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात
आले आहे.