रायगड जिल्ह्यात ८१ पैकी ३४ जणांनी करोनाविरुध्दची जिंकली लढाई
लढवय्या रोखठोक : न्यूज नेटवर्कसौजन्य (जिमाका)
जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना करोनाची लागण झाली. जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी ७१७ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तपासणी अंती ६१६ नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात ८१ जणांना करोना लागण झाली असून आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ३४ रुग्णांनी करोनाला हरवून माणसाची जगण्याची जिद्द सिद्ध केली आहे. या ३४ करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे. दुर्देवाने ३ जणांचे जगण्याचे प्रयत्न असफल झाले.
जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत उपजिल्हा रुग्णालय पनवेल : २५ (उत्तम),
मुंबई फोर्टिज हॉस्पिटल मुलुंड- ३ (उत्तम), सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई-२ (उत्तम), रिलायन्स रुग्णालय, नवी मुंबई-१ (उत्तम), जगजीवन रुग्णालय, मुंबई -१ (उत्तम), एम. जी. एम. रुग्णालय, कामोठे – ५ (उत्तम), वेदांत रुग्णालय ठाणे- १ (उत्तम), फोर्टीज रुग्णालय, नवी मुंबई - १ (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय- १ (उत्तम),भाभा रुग्णालय, मुंबई १
(उत्तम), भाटिया रुग्णालय,मुंबई- १ (उत्तम), राजावाडी रुग्णालय, मुंबई- १ (उत्तम), सायन रुग्णालय, मुंबई-१(उत्तम), अशा एकूण ४४ करोना बाधित व्यक्तींचे विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत आणि त्यांची प्रकृती उत्तम असून तेही लवकरच पूर्ण बरे होऊन आपआपल्या घरी परततील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.