१८ महिन्याच्या बाळाने कोरोना बरोबरचे युद्ध जिंकले .
उरण : प्रतिनिधी
उरण परिसरात कोरोनाची लागण झालेल्या १८ महिन्याच्या बाळाने आज कोरोनाच्या संकटांवर मात केली असून कोरोना बरोबरचे युद्ध त्याने जिंकले आहे.
उरण जसाई याठिकाणी असलेल्या या बाळाला कोरोनाची लागण झालेली होती या घटने नंतर एकच खळबळ तालुक्यात उडाली होती आणि मोठी जबाबदारी प्रशासनावर आली होती .
गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित असलेल्या या बाळाची आज कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने पनवेल उरण परिसरात नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
रायगड जिल्हा परिषद ,पनवेल महानगरपालिका या संपूर्ण टिम चे हे अदभुत यश आहे .