हजारोंंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : भाजपानेते आशिष शेलार - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

हजारोंंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : भाजपानेते आशिष शेलार

हजारोंंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : 

भाजपानेते आशिष शेलार



मुंबई : लढवय्या रोखठोक न्यूज नेटवर्क


     मुंबईच्या विविध भागातून हजारोचा जनसमुदाय टाळेबंदी मध्ये अचानक रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? असे थेट सवाल भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
  वांद्रे पश्चिम येथे आज अचानक रेल्वेस्टेशन परिसरात स्थलांतरित नाका कामगार व बांधकाम मजुरांचा जमाव गोळा झाला.  त्यामुळे तणावाचे वातावरण होते. 
 याबाबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, खरंतर पालकमंत्री म्हणून आपण घटनास्थळी तातडीने येण्याची गरज होती, नाही तर किमान खरी माहिती तरी घेणे अपेक्षित होते.
 चार-पाच दिवसापूर्वी बांधकाम आणि नाका कामगार संघटनेने या परिसरात निदर्शने केली होती, ती निदर्शने सरकारने गांभीर्याने का घेतली नाहीत?  सरकारने त्यां संघटनेशी चर्चा का केली नाही? त्यांची मागणी ही रेशनींगचे धान्य आणि अन्न मिळावे हीच होती.  मुंबईच्या विविध भागातून आज अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार,गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का? नाका व बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देणे असलेली  हक्काची मदत या कामगारांना  अजून का मिळाली नाही ? ती फाईल कुठल्या टेबलवर का अडकुन पडली आहे  ? असे थेट प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
  रेल्वेगाड्या सुरू करा असा आताच्या घडीला युक्तिवाद करणे हा केवळ अपरिपक्वते चे दर्शन घडवणारा आहेच तसेच असे म्हणणाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही, याचे दर्शन करणारा आहे. आत्ता जर देशभर लोक फिरू लागले तर लाँकडाऊनचा उपयोग काय? रेल्वे सेवा सुरू केल्याने १३० कोटी भारतीयांच्या आजपर्यंतच्या परिश्रमाचा पराभव होईल आणि कोरोना व्हायरस विरुद्ध भारताचा लढा कमकुवत होईल, असे ही आमदार  अँड.आशिष शेलार यांनी म्हटले आहे.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0