पनवेल परिसरात ५ कॊरोना रुग्णांची नोंद :पोलिस व पत्रकाराचा समावेश - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल परिसरात ५ कॊरोना रुग्णांची नोंद :पोलिस व पत्रकाराचा समावेश

पनवेल परिसरात ५ कॊरोना रुग्णांची नोंद .

 पोलिस व पत्रकाराचा समावेश 


पनवेल : लढवय्या रोखठोक




कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आज एकूण ५ कोरोना बाधित रुग्ण यांची नोंद करण्यात आलेली आहे.  त्यापैकी ४ कामोठे व १ रुग्ण नवीन पनवेल भागातील असून पनवेल महानगरपालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ४९ झालेली आहे.
 कामोठे येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्विड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती महाराष्ट्र पोलिस दलात काम करीत आहे. सदर व्यक्तीवर एम.जी.एम.रूग्णालय, कामोठे येथे उपचार सुरू आहेत. ही व्यक्ती दररोज कामोठे ते सी.एस.टी. असा बसप्रवास करीत होती.
  या व्यक्तीला मुंबई येथील कामाच्या ठिकाणी अथवा प्रवासादरम्यान लागण झाल्याबाबत प्राथमिक अंदाज आहे. ही व्यक्ती
अगोदरपासूनच कॅन्सर आजारावर उपचार घेत आहे. त्याच प्रमाणे कामोठे येथील ४४ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला व्ही.एन.देसाई जनरल हॉस्पीटल, सांताक्रुझ येथे
सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे.  हॉस्पीटल मधूनच त्या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. हया महिलेवर  भाभा हॉस्पीटल, कुर्ला येथे उपचार सुरू आहेत. त्याच प्रमाणे कामोठे सेक्टर-३४ येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती ट्रॉम्बे म्युनिसिपल डिसपेन्सरी, मुंबई येथे
फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीस मुंबई येथील कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. हया व्यक्तीवर
उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे उपचार सुरू आहेत.तसेच
कामोठे सेक्टर १५ येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती एका वृत्त वहिनीसाठी  पत्रकार म्हणून काम करीत आहे. सदर व्यक्तीस मुंबई येथील कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सध्या ही व्यक्ती फर्म हॉटेल,
गोरेगाव, मुंबई येथे दिनांक २०/०४/२०२० पासून विलगीकरण कक्षामध्ये आहे.
नवीन पनवेल येथील २७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला सायन हॉस्पीटल, मुंबई येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे.
  सदर हॉस्पीटलमधूनच त्या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सदर महिलेवर सेवन हिल हॉस्पीटल,
मुंबई येथे उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0