पनवेल हद्दीत २ कॊरोना रुग्ण मुंबई येथील वैद्यकीय अधिकारी व सफाई कामगाराचा समावेश - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल हद्दीत २ कॊरोना रुग्ण मुंबई येथील वैद्यकीय अधिकारी व सफाई कामगाराचा समावेश

पनवेल हद्दीत २ कॊरोना रुग्ण

मुंबई येथील  वैद्यकीय अधिकारी व सफाई कामगाराचा समावेश .


पनवेल : लढवय्या रोखठोक


पनवेल परिसरातील  आज  २ कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे.
  पनवेल मधील खांदा कॉलोनी व नवीन पनवेल या परिसरातील २ नवीन रुग्ण आढळले असल्याने परिसरात घबराट पसरली आहे .
  यामध्ये मुंबई येथील एका  वैद्यकीय अधिकारी तसेच एका सफाई कर्मचाऱ्याचा समावेश आहे .
  सिडको कॉलनी , नविन पनवेल येथील ५१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड - १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे . सदर कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे .
खांदा कॉलनीमधील १ महिला डॉक्टर कोव्हिड - १९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . त्या बॉम्बे पोर्ट ट्रस्ट , मुंबई येथे वैद्यकीय  अधिकारी म्हणून कार्यरत आहेत .

  

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0