कॊरोनाचे ४ नवीन रुग्ण पनवेल ,खारघर , कामोठे , कलंबोलीचा समावेश - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कॊरोनाचे ४ नवीन रुग्ण पनवेल ,खारघर , कामोठे , कलंबोलीचा समावेश

कॊरोनाचे ४ नवीन रुग्ण 

पनवेल ,खारघर , कामोठे , कलंबोलीचा समावेश 

पनवेल : लढवय्या रोखठोक


  पनवेल महानगरपालिका हद्दीत आज एकूण ४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे यामध्ये खारघर येथील १ व्यक्ती कोव्हिड - १९ पॉझिटिव्ह आलेली आहे .
  ही व्यक्ती पोलिस कर्मचारी असून कामानिमित्त खारघर ते
बांद्रा प्रवास करत होती . या दरम्यान त्यांना लागण झाल्याची शक्यता आहे . तसेच कामोठे येथील ५९ वर्षाची १ व्यक्ती कोव्हिड - १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . या व्यक्तीस अगोदरपासूनच मुत्र विकाराचा व
रक्तदाबाचा त्रास आहे . पनवेल येथील १ व्यक्ती कोव्हिड - १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . ही व्यक्ती डॉक्टर असून अष्टविनायक हॉस्पीटल , खांदाकॉलनी येथे व्यवसाय करते . त्याच प्रमाणे कळंबोली येथील १ व्यक्ती कोव्हिड - १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . यांना झालेला संसर्ग हा अष्टविनायक हॉस्पीटलमध्ये
झालेला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे .
   सर्वांनी काळजी घ्या दक्षता घ्या व गर्दी टाळा असे अवाहन पनवेल महानगर पालिकेकडून करण्यात आलेली आहे .


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0