उरण कोट नाका व जेएनपीटी टाऊनशिप करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

उरण कोट नाका व जेएनपीटी टाऊनशिप करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

                                                                                       

उरण  कोट नाका व जेएनपीटी टाऊनशिप

  करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

 उरण (लढवय्या रोखठोक न्यूज नेटवर्क )
    जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कोट नाका व जेएनपीटी टाऊनशिप व त्याच्या आजूबाजूचा परिसरामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी आनंदी निवास, आनंदी हॉटेल , राघोबा देवमंदिर, मच्छी मार्केट, सतीश फोटो स्टुडिओ, शिवप्रेरणा इमारत, राखे बिल्डींग, काळा धोंडा- , भोईर बंगला ,केळकर बिल्डिंग, जेएनपीटी टाउनशिप सेक्टर- २ए ९० ते ९५ हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
       या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड  श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. 
       या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ७१, १३९ तसचे भारतीय दंड संहिता ४५ ऑफ १८६० च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0