कळंबोली , तळोजा , उरण बेलापूर परिसरात एकूण ६ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले .
पनवेल : प्रतिनिधी
शहरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे आहे आज प्रशासकीय अहवालानुसार कळंबोली ,तळोजा, उरण , बेलापूर परिसरात नवीन करूना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे .
अपोलो हॉस्पिटल, बेलापूर मध्ये १ व्यक्ती दिनांक ०९/०४/२०२० पासून टी.बी. व अन्य गंभीर आजाराने अॅडमीट आहेत ते मुळचे खारघरमधील रहिवाशी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची कोव्हिड-१९ टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे. त्याच प्रमाणे कळंबोलीमधील १ व्यक्ती अपोलो हॉस्पिटल, बेलापूर मध्ये अॅडमीट असून त्यांना टी.बी., मधुमेह, अतिरक्तदाब, न्युमोनिया, कावीळ असे दुर्दम्य आजार असून त्यांची कोव्हिड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे.
त्याच प्रमाणे खारघरमधील १ व्यक्तीची कोव्हिड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असून त्यास उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
त्याच प्रमाणे नवीमुंबई येथे दवाखान्यात काम करणारी व यापुर्वीच बेलापूरमध्ये कॉरंटाईन असलेली तळोजा फेज-१ मधील रहिवाशी १ व्यक्ती आज
कोव्हिड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असून
उरण येथील २ व्यक्ती अपोलो हॉस्पिटल, बेलापूर येथे दाखल असून त्यांचीही कोव्हिड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे.