मुंबईवेस्ट मॅनेजमेंटच्या वतीने गरजूंना धान्याचे वाटप - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

मुंबईवेस्ट मॅनेजमेंटच्या वतीने गरजूंना धान्याचे वाटप

मुंबईवेस्ट मॅनेजमेंटच्या वतीने   गरजूंना धान्याचे वाटप
तळोजा : लढवय्या रोखठोक

कोविड १९ (कोरोना) विषाणूचा परिणाम भारत आणि जगभरात मोठ्या प्रमाणात होतो आहे.
  या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊन लागू झाला आहे . 
  लॉकडाऊनमुळे अनेक रोजंदारीवर कामगार व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून लॉकडाऊनचे वाईट परिणाम उद्भवत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवलेली असताना या लोकांना राज्य शासनाने मदतीचा विश्वास दिला असताना काही दानशूर लोकांनी याबाबत पावलं उचलायला सुरवात केली आहे .
  तळोजातील मुंबईवेस्ट मॅनेजमेंट  कंपनी रामकी फाउंडेशनच्या पुढाकाराने तळोजा
एमआयडीसी आसपासच्या खेड्या पाड्यातील, एकण १००० कुटुंबांना शिधा ( किराणा धान्य ) वाटप करण्यात आले आहे .
तांदूळ , डाळ , तेल ,मिठ , साखर  , मसाले यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या समावेश करण्यात आलेला आहे .
   तळोजा मुंबईवेस्ट मॅनेजमेंटचे प्रकल्प प्रमुख सोमनाथ मालगर यांच्या वतीने या धान्याच्या वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे  .
  घोटगाव, सिध्दी करवले, तळोजा मजकूर या गावात कुटुंबांना मदत देण्यात आली आहे.
  याआधी  देखील तळोजा पोलिसांना कॊरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या मास्कसाठी आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात आलेली आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0