कळंबोलीतील कचरा तासाभरात उचलला .
लढवय्या रोखठोकच्या बातमीची महापालिकेकडून दखल
कळंबोली : प्रतिनिधी
"कळंबोली शहरात कचऱ्याचा खच" या मथळ्याखाली "लढवय्या रोखठोकने" बातमी प्रकाशित केल्या नंतर प्रशासनाने बातमीची दखल घेत काही वेळातच तात्काळ त्या ठिकाणी साचलेला कचरा उचलण्यासाठी वाहन पाठवून सदर कचरा उचलण्यास सुरवात केली आहे .
कळंबोली सेक्टर ४ ई याठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून कचरा साचला होता त्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली होती.