तळोजात निर्जंतुकीकरण करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष ; नागरिकांनी व्यक्त केली खंत - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

तळोजात निर्जंतुकीकरण करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष ; नागरिकांनी व्यक्त केली खंत

तळोजात निर्जंतुकीकरण करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष ;

 नागरिकांनी व्यक्त केली खंत 


तळोजा : लढवय्या रोखठोक

 


तळोजा फेज १ परिसरात सध्या धूर फवारणी व निर्जंतुकीकरण  करण्यासाठी येथील नागरिक वारंवार मागणी करत असून महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची खंत येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे .
   सध्या देशाला करोना विषाणूचे ग्रहण लागलेले असताना शहरात बऱ्याच ठिकाणी योग्य अशी उपाययोजना केली जात नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .
 तळोजा फेज १  परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी  दिरंगाई होत असल्याचे येथील रहिवासी सांगतात .
 गेल्या काही दिवसापूर्वी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना तक्रार करून देखील कोणत्या प्रकारची हालचाल होत नसल्याचे येथील राहिवासीयांचे म्हणणे आहे . 
  थेट आयुक्तांना तक्रारीचे मसेज पाठवून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही .
  करोना च्या भीती मुळे व अपुऱ्या सोयीसुविधे मुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
  तळोजा फेज १ येथील  सामाजिक कार्यकर्ते प्रसाद ढगे पाटील यांनी या भागात लवकरात लवकर धुर फवारणी व निर्जंतुकीकरण करण्याची मागणी केली आहे .

  

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0