नगरसेवकांच्या पुढाकाराने अखेर कळंबोलीत निर्जंतुकीकरण - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नगरसेवकांच्या पुढाकाराने अखेर कळंबोलीत निर्जंतुकीकरण

 नगरसेवकांच्या पुढाकाराने अखेर कळंबोलीत निर्जंतुकीकरण


कळंबोली : लढवय्या रोखठोक


   जगभरात करोना विषाणूने थैमान घातले असताना विविध शहरांच्या सुरक्षेबाबत गंभीर पावले उचलली जात आहेत .
  देशभरात लोक डाऊन जाहीर झाल्यानंतर नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान देखील केले जात आहे .
 कळंबोली शहरात याच अनुषंगाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव भविष्यात होऊ नये याकरता पनवेल महानगरपालिका व कळंबोली शहरातील नगरसेवकांच्या पुढाकारातून संपूर्ण प्रभागात निर्जंतुकीकरण व धूर फवारणी सारख्या उपायोजना करण्यासाठी सुरुवात झाली आहे .
 कळंबोली शहरातील प्रभाग ७, प्रभाग ८, प्रभाग ९, प्रभात १० याठिकाणी स्वतः नगरसेवक यांनी गांभीर्य लक्षात घेऊन  प्रत्येक प्रभागात स्वतः उपस्थित राहून आपल्या प्रभागातील संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करून घेण्याकरता पुढाकार घेतला आहे त्यामुळे कळंबोलीतील नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
  त्याचप्रमाणे शहरातील विविध स्थानिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत देखील करोना बाबत जनजागृती केली जात आहे , त्याचप्रमाणे शहरात असलेल्या काही असंघटित नागरिकांना  जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था यामार्फत केली जात आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0