" कोविड १९ " रुग्णालय पनवेल मध्ये. - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

" कोविड १९ " रुग्णालय पनवेल मध्ये.

  " कोविड १९ " रुग्णालय  पनवेल मध्ये 

पनवेल उपजिल्हा रुग्णालय जिल्हा कोविड रूग्णालय म्हणून ओळखले जाणार .

    अलिबाग : लढवय्या रोखठोक 


   पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या करोना कोविड १९ रुग्णालयाची जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी नुकतीच पाहणी केली.

  यावेळी त्यांच्यासमवेत पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख,प्रांताधिकारी दत्ता नवले, तहसिलदार अमित सानप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले यांची उपस्थिती होती.

 हे १२० खाटांचे रुग्णालय आता जिल्हा कोविड रुग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे. पूर्णतः विलगीकरण कक्ष असलेले हे रुग्णालय सर्वतोपरी सुसज्ज ठेवण्यात आले आहे. या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांना  तपासणीसाठी व प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या महानगरपालिकेच्या क्लिनिकमध्ये तर प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांना नजीकच्या एमजीएम इस्पितळात पाठविले जाणार आहे.याकरिता एमजीएम रुग्णालयाचे मुख्य ट्रस्टी  सुधीर कदम आणि या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सलगोत्रा यांच्याशीही चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0