मत्स्य व मत्स्यखाद्य यांची अत्यावश्यक वस्तू म्हणून
वाहतूक सुरू करण्यास परवानगी
--- जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी
अलिबाग : लढवय्या रोखठोक न्यूज नेटवर्क
आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथरोग अधिनियम १८९७ च्या कलम २ अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. १४ एप्रिल २०२० या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील आंतरराज्य व जिल्ह्यांतर्गत प्रवेश बंद करण्यात आल्याने मत्स्यशेती शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अधिसूचनेतील निर्देश व तरतूदी विचारात घेऊन प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मत्स्य व मत्स्यखाद्य यांची अत्यावश्यक वस्तू म्हणून गणना करून त्यांची वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे.