एस.आर . जोशी मेमोरियल ट्रस्ट व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे तूर डाळ व तांदळाचे वाटप
पनवेल : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाउन आहे.या कठीण प्रसंगी जनता दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंसाठी चिंताग्रस्त आहे. हातावरचे पोट असलेल्या असंघटित कामगारांचे हाल होत आहेत.त्यांच्या कुटुंबियांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.या बिकट प्रसंगी पनवेलच्या एस आर जोशी मेमोरियल ट्रस्ट व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने पनवेलमधील नाका कामगार व झोपडपट्टीवासीयांना मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून गुरुवारी (ता २६) पनवेलमध्ये तीन हजार किलो तांदुळ व पाचशे किलो तूरडाळीचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी एस आर जोशी मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्षा सुनीता जोशी,ऍड माधुरी थळकर,अविनाश मकास, रोहन गावंड,किरण इनामदार,दत्तू वेलणकर, विक्की धोत्रे, आकाश जमादार, अजय मकास, रोहन घुले, दादा गुंजाळ उपस्थित होते.