अण्णासाहेब पाटील यांची ३८ वी पुण्यतिथी साजरी
पुतळ्याला हार घालून वाहिली श्रध्दांजली
नवीमुंबई : लढवय्या रोखठोक
महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक, माथाडी कायद्याचे जनक,माथाडींचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्ताने कोणताही जाहिर कार्यक्रम न घेता माथाडी भवन,नवीमुंबई येथिल त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अत्यंत साधेपणाने श्रध्दांजली वाहण्यात आली, यावेळी माथाडी कामगार नेते सरचिटणीस नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील,कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप,माजी मंत्री शशिकांत शिंदे,अध्यक्ष एकनाथ जाधव,कायदेशिर सल्लागार अॅड्.भारतीताई पाटील,संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील,रविकांत पाटील,पोपटराव देशमुख,दिलीप खोंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कोरोना या महाभयंकर संसर्ग रोगाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य विषयीच्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन तसेच जमावबंदीच्या आदेशाचे पालन करुन प्रमुख कार्यकर्त्यांनी एक-एकाने माथाडी भवन येथे येऊन आपल्या आराध्यदैवत असलेल्या स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांना श्रध्दांजली वाहिली. कार्यालयीन कर्मचा-यांचे प्रमुखही यावेळी उपस्थित होते.
माथाडी कामगार व कर्मचा-यांनी केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे उल्लंघन होऊ नये म्हणून स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेची पुजा करुन आप-आपल्या घरीच त्यांना श्रध्दांजली वाहिली.
कोरोना या महाभयंकर संसर्ग रोगापासून बचाव करण्यासाठी माथाडी कामगार व कर्मचा-यांनी आप-आपल्या आरोग्याचे काळजी घ्यावी,केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करावे,आपण सुरक्षित रहा व जनतेलाही सुरक्षित रहाण्यासाठी मदत करा,असे आवाहन स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त माथाडी कामगार नेते नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले.