जमावबंदी उल्लंघन प्रकरणी पनवेलात ३७ जणांवर गुन्हे दाखल - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

जमावबंदी उल्लंघन प्रकरणी पनवेलात ३७ जणांवर गुन्हे दाखल

करोना जमावबंदी उल्लंघन प्रकरणी पनवेलात

३७ जणांवर गुन्हे दाखल


  पनवेल : लढवय्या रोखठोक


  राज्यात करोना विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी रायगड तसेच पोलीस आयुक्त नवी मुंबई , पनवेल महानगरपालिका यांनी कोणत्याही अत्यावशक / वैद्यकीय कारण वगळता आपल्या घराच्या बाहेर पडू नये .
  तसेच ५ व त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये याकरिता लेखी आदेश पारित केलेला असताना देखील बरेच नागरिक करोना विषाणू बाबत गंभीर नसल्याचे समोर येत असून कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे .
  अशाच उल्लंघन करणाऱ्या ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
  त्यापैकी पनवेल परिसरातील ३४ जणांवर तर कळंबोली परिसरातील ३ हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच प्रमाणे कळंबोली परिसरात विनाकारण घराबाहेर पडून सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल ३७ जणांवर भारतीय दंड संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१, २९०, ३३७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १५१ कलम ३७/१/३ साथीचा  रोग प्रतिबंधात्मक कायदा ८९७ २,३,४  महाराष्ट्र कोविड - १९ उपयोजना नियम २०२० चे नियम ११ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम ५१ अ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
  नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ २ च्या वतीने पनवेल मधील सर्व नागरिकांना यावेळी पोलिसांनी आव्हान केले आहे की,
  कोणत्याही प्रकारे अत्यावश्यक व वैद्यकीय कारण वगळता घराबाहेर पडू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल अशी सूचना देण्यात आली आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0