मंत्रालय बँकेच्या संचालक पदी सुनिल खाडे
प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मोठ्या मतांनी विजय
मुंबई (लढवय्या रोखठोक )
महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी, कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिक्षक सुनिल खाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे . मंत्रालयातील अधिकारी, कर्मचार्यांच्या असलेल्या बँकेची उलाढाल सुमारे सहाशे ते सातशे कोटी पर्यंत असल्याने या बँकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
महाराष्ट्र मंत्रालय अॅण्ड अलाईड ऑफिसेस को ऑपरेटीव्ह बँकेच्या पंधरा संचालक पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत सभासदामधील प्रमुख दोन पॅनल मैदानात होते. भटक्या जमाती, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून तगडे तीन उमेदवार असल्याने या गटातून कोण निवडून येणार याकडे लक्ष लागले होते , मात्र माहिती व जनसंपर्क विभागातील अधिक्षक सुनिल खाडे यांनी आपले प्रतिस्पर्धी मंत्रालय संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मुंजाळे, जिमखाना संचालक सतीश सोनवणे अशा तगड्या ऊमेदवारांचा लोकप्रियतेच्या जोराव पराभव करुन विजय मिळवला आहे .
मंत्रालयातील कर्मचार्यांच्या अडीअडचणीत कायम धावून जाणारे सुनिल खाडे यांचा मोठा संपर्क आहे. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत सुनिल खाडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून संचालक मंडळात प्रवेश केला आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्थरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
पनवेलचे भाजप नेते बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बाळासाहेब पाटील यांच्या सह देविदास खेडकर , राजेंद्र बनकर मच्छिन्द्र कुरुंद यांच्या सह खाडे यांचे हितचिंतक उपस्थित होते .
आपले मनोगत यावेळी व्यक्त करताना बाळासाहेब पाटील म्हणाले की सुनील खाडे या सारखा दिलदार मित्र म्हणून मला त्यांचा नेहमी अभिमान वाटतो गोरगरिबांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणाऱ्या व सडेतोड स्वभावामुळे खाडे यांच्या सोबत नेहमीच मैत्री पलीकडचे नाते जोडले गेले आहेत असे सांगून त्यांनी त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर सुनील खाडे यांनी हा विजय माझ्यावर विश्वास दाखवलेल्या हितचिंतकांचा , मित्र परिवाराचा , अधिकारी कर्मचारी वर्गाचा , कुटुंबीयांचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .