राजपत्रित अधिकारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी : प्रकाश खोपकर यांची बिनविरोध निवड - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

राजपत्रित अधिकारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी : प्रकाश खोपकर यांची बिनविरोध निवड

राजपत्रित अधिकारी संघटनेच्या  राज्यस्तरीय

कार्याध्यक्ष पदी प्रकाश खोपकर यांची बिनविरोध निवड 

लढवय्या रोखठोक : न्यूज नेटवर्क 


   महाराष्ट्र विकास सेवा राज्यपत्रीत अधिकारी व राज्य कार्यकारणी संघटनेच्या शिर्डी येथे पारपडलेल्या राज्यस्थरीय अधिवेशनात रायगडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  प्रकाश खोपकर यांची संघटनेच्या राज्यस्तरीय कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
  संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक सिरसे , उपाध्यक्ष राजेश कुलकर्णी , कोषाध्यक्ष रत्नाकर पगार , सचिव वासुदेव सोळंके ,
सहसचिव सुनील भोकरे व महिला प्रतिनिधी दिपाली देशपांडे
यांची निवड करण्यात आली आहे.
  प्रकाश खोपकर महाराष्ट्र विकास सेवेतील राज्यपत्रीत अधिकारी असून महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभागाचे १९९८ वर्ग दोन चे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे .
   रायगड जिल्हा राज्यपत्रीत अधिकारी महासंघाचे प्रभावी कार्यक्षम अध्यक्ष म्हणून खोपकर यांचा हातखंडा राहिला आहे.
त्यांची महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्यस्थरीय कार्याध्यक्ष पदी निवड बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
     रायगड मध्ये  म्हसळा ,  पोलादपूर , महाड ,माणगाव ,    मुरबाड  या ठिकाणाचा कार्यकाल सांभाळला असून      नाशिक आयुक्त  कार्यालयात  सहा.  आयुक्त (रोहयो )आणि  महाराष्ट्र  राज्य जीवोननती अभियान. नवी मुंबई  येथे उपसंचालक  म्हणून  सेवा केली आहे. सध्या  उपमुख्य कार्यकारी  अधिकारी (साप्रवि) जि प  निवड श्रेणी  म्हणून  कार्यरत  आहेत.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0