पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ५ शिवभोजना केंद्रांना मान्यता - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ५ शिवभोजना केंद्रांना मान्यता

शिवभोजन योजना :  पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ५ शिवभोजना केंद्रांना मान्यता



अलिबाग : लढवय्या रोखठोक

   रायगड जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्याबाबत अलिबाग येथे दोन शिवभोजन केंद्र व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाच शिवभोजन केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.
 या योजनेमध्ये गरीब व गरजू व्यक्तींना रु.१०/- रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध होणार आहे. , शिवभोजन केंद्राची वेळ दररोज दुपारी बारा ते दोन अशी आहे. शिवभोजनात २ चपाती, १ वाटी भाजी, १मूद भात व १ वाटी वरण याचा समावेश आहे.  शिवभोजन केंद्रासाठी शहरी भागात रु.४०/- तर ग्रामीण भागात. रु.२५/- प्रती थाळी शासनाकडून शिवभोजन केंद्र चालकास अनुदान मिळणार आहे.

शासनाने निर्देशित केलेल्या शिवभोजन ॲपवर प्रत्येक पात्र ग्राहाकांनी आपली नोंद करुन शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावयाचा आहे. शासन निर्देशित शिवभोजन ॲपच्या माहितीच्या अनुषंगाने केंद्र चालकास अनुदान मिळणार आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे दोन शिवभोजन केंद्र व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाच शिवभोजन केंद्राना मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषद अलिबाग यांकडून आज यादी जाहीर करण्यात आली
त्यांची नावे पुढीलप्रमाणे-

(अलिबाग)
१) सुरभी स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, पत्ता- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अलिबाग. शिवभोजन थाळीची संख्या- १००.
२) मुन्ना चायनिज सेंटर, पत्ता-बस स्थानकाजवळ महावीर चौक अलिबाग- जि.रायगड. शिवभोजन थाळीची संख्या- १५०

(पनवेल)
   पनवेल महानगरपालीका क्षेत्रात पाच शिवभोजन केंद्र मंजूर आहेत ती पुढीलप्रमाणे-
 १) न्यू संतोष स्वीट, हॉटेल अंबर मार्केट, टपालनाका, मार्केट यार्ड, भाजी मार्केट, उरण नाका सर्कल, ता.पनवेल जि.रायगड - शिवभोजन थाळीची संख्या- १२५
 २) सप्तश्रुंगी सहाय्यता महिला मंडळ, कामोठे पनवेल, पत्ता-कामगार नाका,कामोठे बस स्थानक,एमजीएम व सीटी हॉस्पीटल परिसर. मंजूर थाळी संख्या-१२५
 ३) हॉटेल ओम, रत्नाकर खरे मार्ग, पनवेल कोर्टाजवळ, शिवभोजन थाळीची संख्या- १०० ४) हॉटेल कडक स्पेशल, गाळा नं.६, इंद्रधाम सोसायटी, प्लॉट नं.६७,सेक्ट्र ६अ, कामोठे, कामगार कॉलनी- शिवभोजन थाळीची संख्या- १००
 ५) श्री गणेश कृपा महिला बचत गट गोल्डन टॉवर प्लॉट नं.१५,सेक्टर २४, फेज २,तळोजा पाचनंद- पत्ता आरटीओ वाहन तपासणी तळ  शिवभोजन थाळीची संख्या- १००

तसेच या भोजनालयात बाहेरचे जेवण घेवून येण्यास व भोजनालयातून जेवण बाहेर घेवून जाण्यास मनाई आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवण्यास सक्त मनाई आहे. असे आवाहन निधी चौधरी,
जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.



महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0