महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न करून फासावर लटकविले - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न करून फासावर लटकविले

 चोरीच्या आरोपावरुन महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न करून फासावर लटकविले


पनवेल,  (वार्ताहर)
  पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात राहणार्‍या एका ५५ वर्षीय महिलेवर मंगळसूत्र चोरीचा आरोप करून प्रथम तीला जाळून मारुन त्यानंतर फासावर लटकविल्याची भयानक घटना घडली असून या प्रकरणी फरार असलेल्या पाच आरोपींचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.
पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात राहणारी शारदा गोविंद माळी ( ५५) हिचे शेजारी राहणार्‍या कुटुंबियांबरोबर मंगळसूत्र चोरीच्या  कारणावरुन वाद झाला होता. यातून त्यांनी तिला प्रथम जाळून नंतर फासावर लटकविल्याचा  आरोप मयताची मुलगी आणि पतीने केला आहे. याबाबत त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करावे आणि त्यांना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी फरार झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरू आहे. यामध्ये अलका गोपाळ पाटील (४५) वनाबाई अर्जुन दवणे (६०) गोपाळ विट्ठल पाटील (४८) हनुमान भगवान पाटील (४२), अशी आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन तरुणी आहे.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0