हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक
कचऱ्याच्या नावावर हजारो रुपयांची वसुली .
लढवय्या रोखठोक :
पनवेल महानगरपालिकेकडून स्वच्छ पनवेल सुंदर पनवेलचा नारा दिला जात आहे ,
त्यासाठी पनवेल महापालिका योग्यप्रकारे उपायोजना देखील करत आहे मात्र याचाच फायदा काही दलालांनी घेतला असून
हॉटेल चालकांकडून दरमहा ५ ते ६ हजारांची वसुली बळजबरी केली जात असल्याचे समोर येत आहे . यामध्ये काही राजकीय मंडळींचा हात असल्याचे समोर येत आहे .
पनवेल हद्दीत लहान मोठे हॉटेल , बार मधून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असते हा कचरा पनवेल महानगर पालिकेकडून उचलण्यात येत असतो मात्र गेल्या काही महिन्यांपासून काही दलालां मार्फत या कचरा उचलण्याच्या नावावर वसुली केली जात आहे . याबाबत शहरातील बार असोसिएशन ने पनवेल महानगर पालिकेसोबत चर्चा केली असता आम्ही कोणतीही संस्था नेमली नसल्याचे पालिकेने सांगितल्याचे असोसिएशन ने सांगितले आहे .
त्यामुळे पनवेल महानगर पालिकेच्या नाकावर सुरू असलेल्या या प्रकाराला जबाबदार कोण ? हा प्रश्न उपस्थित होत आहे , त्यामुळे
व्यवसायिकांची कचऱ्याच्या नावावर वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .
कळंबोली शहरात काही हॉटेल व्यवसायिकांना या कचऱ्याची ५ हजार ९०० रुपयांचे बिल धाडण्यात आलेली आहेत
एस. जी. एंटरप्राइजेस च्या नावाने हे बिल हॉटेल व्यवसायकांना बळजबरी देण्यात आल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे .
पनवेल महानगरपालिका हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांकडून ओला कचरा घेऊन त्यांच्याकडून दर महिन्याला हजारोंच्या संख्येत रक्कम उकळली जात आहे मात्र पनवेल महानगरपालिकेने अशा कुठल्याही संस्थेला अधिकृत रित्या कचरा उचलण्यासाठी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे , याबाबत नवी मुंबई बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी " लढवय्या" सोबत बोलताना सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून हॉटेल व्यवसायिकांना नाहक त्रास दिला जात असून दरमहा पाच ते सहा हजार रुपये बिल त्यांच्या हॉटेलमध्ये दिली जात आहेत याबाबत लवकरच कायदेशीर कारवाई करू असा इशारा त्यांनी व्यक्ती यावेळी दिला .