कळंबोलीत ७ तासापासून वीजपुरवठा खंडीत
कळंबोली : लढवय्या रोखठोक
कळंबोली शहरात सकाळी ७ वाजल्यापासून खंडीत झालेल्या विजेने दुपारी २ नंतर देखील दडी मारल्याने कळंबोलीतील नागरिकांचे मोठे हाल झाले .
नेहमी विजेच्या लपाछपी मुळे पुन्हा एकदा पनवेल महावितरणच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जाऊ लागलीय आहे.
कळंबोली शहरातील सेक्टर ४ई , ५ , १० प्रमाणे इतर सेक्टरच्या काही भागात आज सकाळी ७ पासून वीज पुरवठा खंडित असल्याने येथील नागरिकांना सकाळी दैनंदिन कामात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे .
कळंबोलीतील जोग कॉलनी भागात अचानक केबल खराबी मुळे विजेचा पुरवठा खंडित असल्याचे महावितरणाचे अभियंता सुर्यतळ यांनी सांगितले आहे .
कळंबोली शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित असण्याच्या प्रकारानंतर देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात विजेचा भुर्दंड वाढीव वीज बिलाच्या मार्फत सोसावा लागत असल्याने नागरिक या प्रकरणानंतर मेटाकुटीला आले आहेत .