खिडुकपाडा गावात दत्तभक्तांचा महासागर - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

खिडुकपाडा गावात दत्तभक्तांचा महासागर

 दत्तजयंती उत्साहात : खिडुकपाडा गावात दत्तभक्तांचा महासागर 


कळंबोली : लढवय्या रोखठोक

खिडुकपाडा गावात प्रभूदास भोईर आयोजित  दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला या उत्सवाला अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती दाखवली .
  खिडुकपाडा गावाचे सुपुत्र व दत्तभक्त प्रभूदास भोईर यांनी यंदा ही सलग १५ वर्षाची परंपरा जोपासत मोठ्या उत्साहात दत्तजयंती साजरी केली .
  राजकारण  ,समाजकारण करणाऱ्या प्रभूदास भोईर यांनी दत्तजयंतीच्या कार्यक्रमातून आपली एक नवीन ओळख पनवेल तालुक्यात निर्माण केली आहे .
   या दत्तजयंतीसाठी  विविध क्षेत्रातील मंडळींनी उपस्थिती दाखवली होती येथील दत्तजयंती उत्सवाने खिडुकपाडा गावाला एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे .
   प्रभूदास भोईर यांच्या मातोश्री कै. सुलोचना भोईर यांच्या दत्तभक्तीतून प्रेरित होऊन दत्तप्रभूंचा आशिर्वाद भोईर कुटुंबावर असल्याने प्रभूदास यांनी सलग १५ वर्ष दत्तजयंती उत्सव थाटात साजरा केला आहे .
  हजारो दत्तभक्तांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती . 
   प्रभूदास यांच्या मित्र परिवाराचे विशेष स्वागत यावेळी करण्यात आले होते . महाप्रसाद व सायंकाळी मनोरंजन म्हणून "दहा बाय दहा" या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन विशेष आकर्षण ठरले होते .
  प्रभूदास भोईर व भूषण म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून दत्तजयंती निर्विघ्नपणे पार पडली . 
  मैत्रितील मोल जपत समाजकार्य व दत्तभक्त म्हणून नावाला आलेल्या प्रभूदास यांच्या कार्याचे कौतुक हितचिंतकांनी केले आहे.

        

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0