१० रुपयात शिवथाळी : कळंबोलीत शिवसैनिकांचा संकल्प - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

१० रुपयात शिवथाळी : कळंबोलीत शिवसैनिकांचा संकल्प

१० रुपयात "शिवथाळी" : कळंबोलीत शिवसैनिकांचा  संकल्प  


कळंबोली :लढवय्या रोखठोक


   शिवसेनेचे सरकार आल्यानंतर गोरगरीब जनतेला अवघ्या दहा रुपयात  जेवण देण्याचा ध्यास बाळगलेल्या शिवसेने तर्फे विविध शहरांमध्ये दहा रुपयात जेवण पुरविण्यात येत आहेत .
  असाच एक संकल्प पनवेल तालुक्यातील कळंबोली शहरात राबविण्यात येत आहे या परिसरातील शिवसैनिकांनी लवकर कळंबोली येथे  दहा रुपयात "शिवथाळी" पुरवण्याचा संकल्प केला असून लवकरच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सेक्टर १ई कळंबोली याठिकाणी ही भोजनव्यवस्था सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येणार आहे.
  शिवशाही महिला बचत गट यांच्यामार्फत या उपक्रमास सुरुवात करण्यात येणार असून
  नागरिकांकडून कळंबोली शिवसेना शहर शिवसैनिकांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0