डॉ.बी.एस.बावस्कर यांना पत्नीशोक
ठाणे / प्रतिनिधीसिडको आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस.बावस्कर यांच्या पत्नी व प्राची हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सुनिता बावस्कर यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. त्या ५७ वर्षाच्या होत्या. गेल्या कित्येक महिन्यांपासून आजारपणाशी त्या झुंज देत होत्या. मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत माळवली. या घटनेनंतर बावस्कर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.