नवघर ग्रामपंचायत अपहार प्रकरण लवकरच कारवाई :
निलम गाडे यांची माहिती
लढवय्या रोखठोक
उरण : प्रतिनिधी
उरण पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नवघर ग्रामपंचायत भ्रष्टाचारप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी तात्काळ कारवाई करून संबंधितांना वर गुन्हा दाखल करावा असे आदेश दिल्यानंतर देखील आज पर्यंत नवघर ग्रामपंचायतीमधील दोषी असलेल्या ग्रामसेवक व इतर अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही ,
मात्र लवकरच या गंभीर घटने बाबत गुन्हा दाखल केला जाईल असे गटविकास अधिकारी निलम गाडे यांनी सांगितले आहे .
नवघर ग्रामपंचायतीच्या लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी रायगड जिल्हा परिषदेने तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या मात्र निवडणुकीचे कारण पुढे करत कारवाई करण्यासाठी उरण पंचायत समिती कडून टाळाटाळ केल्याचे आता पर्यंत समोर आले आहे.
उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनीच अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी देऊन देखील संबंधित दोषी असलेल्या नवघर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व इतर दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने उरण पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे .
त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून पंचायत समिती चाल ढकल करत असून अपहार करणाऱ्यांना अभय मिळाले असल्याचे स्पष्ट होत होते , मात्र या संपूर्ण प्रकरणी उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी लढवय्या सोबत बोलताना सांगितले की लवकरच या प्रकरणी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून गुन्हा दाखल करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे निलम गाडे यांनी सांगितले आहे .
माहिती अधिकारातून नवघर ग्रामपंचायतीचे दप्तर मागविण्यात आले होते मात्र हे चक्क गायब झाल्याची माहिती नवघर ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित ग्रामसेवकांनी वरिष्ठांना कळवले आहे भ्रष्टाचार लपविण्यासाठी शासकीय कागदपत्रांचे दप्तर गहाळ झाल्याने
ग्रामसेवक आकाश पाटील
यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
दप्तराची शोध शोध सुरू आहे मात्र हे दप्तर गायब झाले कसे? किव्हा अद्याप ते नवनिर्वाचित पंचायत कमिटीला सापडत कसे नाही ? हे गुलदस्त्यात आहे .
# नवघर ग्रामपंचायत अपहार प्रकरणी रायगड जिल्हा परिषदच्या वरिष्ठांकडून दिलेल्या आदेशानुसार कारवाई केली जाईल या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही .
( निलम गाडे )
( गट विकास अधिकारी उरण )