कामोठे जंक्शन जवळ लवकरच सिग्नल यंत्रणा : - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कामोठे जंक्शन जवळ लवकरच सिग्नल यंत्रणा :

कामोठे जंक्शन जवळ लवकरच सिग्नल यंत्रणा : 

सचिन गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश .


 कामोठे : प्रतिनिधी
  लढवय्या रोखठोक

सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे जंक्शन याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी याकरिता कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी  वाहतूक शाखा , सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडकोकडे पाठपुरावा केला होता . यांच्या प्रयत्नानंतर कामोठे जंक्शन याठिकाणी लवकरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याचे समोर आले आहे .
   कामोठे उड्डाणपुलखालील महत्त्वपूर्ण असलेल्या कामोठा जंक्शन याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते बहुतांश कामोठे शहरातून मानसरोवर हॉटेल चौकातून कळंबोलीकडे जाणारी वाहतूक त्याचप्रमाणे मुंबई व पनवेलच्या दिशेने ये-जा  होणारी वाहतुकीच्या  वर्दळीत सायंकाळच्या वेळेस सिग्नल अभावी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने येथून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या गैरसोय होत होत्या याच अनुषंगाने याठिकाणी कायमची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून यासर्व समस्येवर तोडगा निघावा यासाठी गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता व त्यामुळे लवकरच २८ लाख रुपयांची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली असून  लवकरच सिग्नल याठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0