महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेची १६० वर्षाकडे यशस्वी वाटचाल
हीरक महोत्सव साजरा
कळंबोली : प्रतिनिधी
सण १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही संस्था बालवाडी ते पदवीत्तर शिक्षणापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहे
वामन भावे , वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मण इंदापूरकर या तीन महान दूरदृष्टी यांच्या एकोप्याने लावण्यात आलेल्या या संस्थेचे शैक्षणिक बीज याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून या संस्थेने १५९ वर्ष पूर्ण करून १६० वर्षात पदार्पण केले आहे.
आज घडीला संस्थेच्या ७५ हुन अधिक शाखा सुमारे ४० हजार विद्यार्थी व २ हजार शिक्षक वर्ग आहेत .
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्ञान मंदिर या संस्थेला १५९ वर्ष पूर्ण झाल्याने १६० व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे या संस्थेचा नुकताच हिरक महोत्सव निमित्त महाराष्ट्र्र एज्युकेशन सोसायटी ज्ञानमंदिर कळंबोली व महाराष्ट्र एज्युकेशन पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली मध्ये अभिवादन यात्रा काढण्यात आली होती.
१६० वर्षांची अविरत परंपरा असलेला ज्ञान रथ यावेळी सजवण्यात आला होता , या ज्ञान
रथावर कोणार्क येथील सूर्य मंदिराच्या रथाच्या चाकाची प्रतिकृती करण्यात आली होती ऐतिहासिक व शिक्षण क्षेत्रात गतीमान असल्याचे यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने दाखवून दिले .
या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व देवी सरस्वती च्या वेशभूषेत शालेय विद्यार्थी अग्रस्थानी दिसत होते अशा या देखण्या व दिमाखदार सोहळ्याची सांगता माजी विद्यार्थी सौरभ तांडेल व वेदांत पब्लिक स्कूल चे चेअरमन यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी सर्व विभागाचे मुख्याध्यापक अमोल माने, संजना बाईत, प्रियांका फडके , मीनाक्षी जोशी उपस्थित होते .