घोट नदीत प्रदूषित पाण्याचा विष प्रयोग . प्रदूषण मंडळाला जाब विचारणार : नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

घोट नदीत प्रदूषित पाण्याचा विष प्रयोग . प्रदूषण मंडळाला जाब विचारणार : नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील

घोट नदीत प्रदूषित पाण्याचा विष प्रयोग .

प्रदूषण मंडळाला जाब विचारणार : नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील 


  तळोजा : लढवय्या रोखठोक                                                                                                                                            शैलेश चव्हाण


   तळोजा औद्योगिक वसाहतीच्या कचाट्यात सापडलेली स्वच्छ निर्मळ असणारी कासाडी व घोट नदी संपूर्णपणे प्रदूषित करण्याचा ठेका तळोजातील कारखानदारांनी प्रदूषण मंडळाच्या कृपाशीर्वादाने घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे , याचा त्रास तळोजातील ग्रामस्थांना व येथील राहत असणाऱ्या रहिवाशांना त्याचप्रमाणे कळंबोली, रोडपाली ,नावडे , खारघर येथील उच्चभ्रू असलेल्या लोकवस्तीला देखील मोठ्या प्रमाणात होत आहे या प्रदूषणाबाबत वारंवार येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवक पत्रकार यांच्या माध्यमातून या गंभीर प्रकाराबाबत आवाज उठवून देखील कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नसलेले प्रदूषण मंडळ दुर्लक्ष करत असल्याने तळोजात होणाऱ्या प्रदूषित पाण्याच्या विष प्रयोगामुळे भयंकर संकट या परिसरातील राहणाऱ्या लोकांवर ओढवले आहे .
  तळोजातील घोटगाव भागात पुन्हा एकदा असाच एक प्रदूषित पाण्याचा विषप्रयोग घोट नदीवर   केला गेल्याचे स्पष्ट दिसून येत आहे या नदीत प्रदूषित रासायनिक विषारी पाणी मिसळल्याने पुन्हा एकदा मोठं संकट येथील ग्रामस्थांवर ओढवले आहे याबाबत या गावचे ग्रामस्थ तसेच नगरसेवक ज्ञानेश्वर  पाटील यांनी  थेट प्रदूषण मंडळाच्या व तळोजा एमआयडीसी अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे खटले दाखल करणार असल्याचे आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे .
  या प्रदूषणाबाबत नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हरित लवादाकडे देखील तगादा लावून याबाबत पाठपुरावा करून हरित लवादाने कारखानदारांन विरोधात  भूमिका घेऊन सुद्धा आजतागायत तळोजा परिसरातील प्रदूषण कमी होण्याचे नाव घेत नाही याला जबाबदार कोण ? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.
   उघड-उघड होणाऱ्या प्रदूषणाबाबत प्रदूषण मंडळ अधिकारी केवळ तक्रारीनंतर याठिकाणी फेरफटका मारून पाण्याचे नमुने घेऊन जातात मात्र आजतागायत कोणत्याही प्रकारे या प्रदुषणाबाबत आळा घालण्यासाठी त्यांच्याकडे उपाययोजना नसल्याचे दुर्दैवं ओढवलेला आहे.
   तळोजात प्रामुख्याने घोट नदी व कासाडी नदी नेहमीच येथील मच्छीमार व गोरगरीब नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.
 मात्र गेल्या काही वर्षांपासून खुलेआम बेसुमार होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील मासेमारी पूर्णतः संपुष्टात आली असल्याने उपासमारीची वेळ इथल्या मच्छीमारांना भेडसावत असताना याबाबत प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे . व हे प्रदूषण रोखण्यासाठी अकार्यक्षम असलेल्या तळोजा एमआयडीसी व प्रदूषण मंडळ यांच्या कामचुकार व गलिच्छ कारभाराने या प्रदूषणाला नाईलाजास्तव नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

 
   

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0