देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : अमृता फडणवीस यांना विश्वास
लढवय्या रोखठोक : पुणे
महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर सेना भाजप युतीच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे गुलदस्त्यात असताना पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे .
पुण्यातील हॉटेल हयात येथील जलशक्ती अभियानाच्या आंतरराष्ट्रीय आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला .
महाराष्ट्राची जनता देवेंद्र यांच्या कामावर आनंदी असून महाराष्ट्रातून त्यांना भरभरून अशिर्वाद व प्रेम मिळत असल्याने मला तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे .