बिजांकुर ग्रुप कडून ठेवीदारांची फसवणूक खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : नागरिकांना राहण्याचे आवाहान - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

बिजांकुर ग्रुप कडून ठेवीदारांची फसवणूक खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : नागरिकांना राहण्याचे आवाहान

बिजांकुर ग्रुप कडून ठेवीदारांची फसवणूक

 खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : नागरिकांना राहण्याचे आवाहान

खारघर / लढवय्या रोखठोक


 नागरिकांना दुप्पट पैसे करून देतो या नावाखाली सध्या काही बोगस कंपन्या फोफावल्या असताना मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत आहेत.
  नवी मुंबईत असेच दुप्पट पैसे करून देतो असे नावलौकिक कमावलेल्या बिजांकुर ग्रुप ऑफ  या कंपनीकडून खारघर भागातील नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आलेले असून याबाबत खारघर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे .
  खारघर प्रमाणे कळंबोली कामोठा पनवेल तळोजा या भागात देखील बिजांकुर ग्रुप यांचे दलाल यांच्यामार्फत अनेक ग्राहकांना दुप्पट पैशाचे आमिष देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये उकळण्याचे प्रकार घडल्याची शक्यता नवी मुंबई पोलिसांनी वर्तविली असून याबाबत नागरिकांनी जागरूक राहण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.
   बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनी यांच्यामार्फत विविध आर्थिक योजनांचा प्रचार करून बाजारभावापेक्षा जास्त परताव्याचे अमिश लोकांना दाखवण्यात आले होते .
दिलेल्या मुदतीची तारीख ओलांडल्यानंतर देखील ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा परतावा न मिळाल्याने बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनी खारघर यांचे संचालक व इतर आरोपी यांच्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०३ / २०१९ भादवि कलम क्रमांक ४२०, ४०६, ४०९, १२०( ब ) सह
एम पी आय डी कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
 संपूर्ण प्रकाराबाबत सखोल तपास सुरू असून खारघर सह तळोजा कळंबोली पनवेल कामोठा भागातील दलालांचा शोध सुरू आहे या प्रकरणानंतर मोठा आर्थिक फसवणुकीचे रॅकेट चा भांडाफोड होणार आहे.महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0