महेश बालदी ठरले किंगमेकर
बालदिंच्या गळ्यातआमदारकीची माळ
लढवय्या रोखठोक
उरण(प्रतिनिधी)
उरण विधानसभा मतदार संघात निवडणुकीदरम्यान यांच्याविरोधात विविध माध्यमातून अपप्रचार झाला होता त्यांच्यावर परप्रांतीय असल्याचा ठपका देखील ठेवून त्यांना पराभूत करण्याचे षड्यंत्र उरणमध्ये पाहावयास मिळाले होते . तरीदेखील निवडणुकीच्या निकालात आघाडी घेत गळ्यात अखेर उरणकरांनी आमदारकीची माळ टाकली आहे
उरणमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ७४४६३ मते मिळवून सेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर(६८७४५ मते ) यांचा ५७१८ मतांनी पराभूत केला तर महाआघाडीचे शेकापचे उमेदवार माजी आमदार विवेक पाटील यांना तिसऱ्या स्थानावर टाकत त्यांना (६१४५६ मते) मिळाली आहेत. त्यामुळे महेश बालदी घासून नाही तर ठासून विजयी झाले. असल्याची घोषणा उरण मध्ये आहे .
१९० उरण विधानसभा मतदार संघात आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.मात्र खरी लढत महायुतीचे व सेनेचे विद्यमान आमदार, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, महाआघाडीचे शेकापचे उमेदवार माजी आमदार विवेक पाटील आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्यातच तिरंगी लढत अपेक्षित होती.
या तीनही उमेदवारांनी विजयासाठी पराकाष्ठा केली होती.पाचव्यांदा निवडणूक लढविणारे शेकापचे विवेक पाटील आणि दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले सेनेचे मनोहर भोईर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सेनेच्या मनोहर भोईर यांच्या प्रचारसभेसाठी उध्दव ठाकरे यांनीही हजेरी लावली होती.मात्र या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात एकहाती प्रचार करीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर एकट्याने मतदारसंघात सभा घेऊन लक्षवेधी विजय संपादन केला आहे.
गुरुवारी ( दि२४) सकाळपासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर नागरिकांना निकालाची प्रचंड उत्सुकता लागुन राहिली होती.पहिल्या एक-दोन फेऱ्या वगळता सुरुवातीपासूनच बालदी यांनी तीन आकड्यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती.ती आघाडी बालदी यांनी २४ व्या अंतिम फेरीपर्यत कायम ठेवली.त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले मनोहर भोईर यांनी दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.या निवडणुकीत अन्य उमेदवार मनसेचे अतुल परशुराम भगत (५०९३ मते),बसपाचे संतोष मधुकर पाटील यांना (१३५८) मते, बसपाचे राकेश नारायण पाटील यांना(१७१२)मते,अपक्ष उमेदवार मधुकर सुदाम कडू(१५८० ),संतोष शंकर भगत( ११३३)मते मिळाली आहेत.तर नोटालाही तब्बल ३०७२ मते मिळाली आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांनी अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना सर्वाधिक मते मिळाल्याने अपक्ष उमेदवार महेश बालदी हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला.
महेश बादली हे उरणचे आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत जासई येथील शिव-समर्थ स्मारकांचे दर्शन घेतले,तसेच शेतकरी लढ्यातील हुतात्म्याना अभिवादन केले आणि लोकनेते दि.बा.पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी लोकनेते दि.बा.पाटील अमर रहे चार नारा दिला.