मतदान केंद्रावरील शासकीय कर्मचारी उपाशी : नियोजनाचा बोजवारा - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

मतदान केंद्रावरील शासकीय कर्मचारी उपाशी : नियोजनाचा बोजवारा

मतदान केंद्रावरील शासकीय कर्मचारी उपाशी : नियोजनाचा बोजवारा 

 लढवय्या रोखठोक / कळंबोली


  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल परिसरात कार्यरत असलेल्या व निवडणुकी  कामकाजासाठी कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचारी यांच्या अल्पोपहाराच  नियोजन बद्दल सोय न झाल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे ,
व त्याचा फटका मतदारांना बसत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे  .
 कळंबोली शहरातील मतदानासाठी नेमलेल्या मतदान केंद्रांवर शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक केलेली आहे सकाळी सात वाजल्यापासून हे शिक्षक कर्मचारी मतदारांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत मात्र त्यांच्या अल्पोपहाराची कोणत्या प्रकारची सोय होत नसल्याने शिक्षक वर्ग तथा शासकीय कर्मचारी घरी जेवणासाठी नाईलाजास्तव जात असल्यामुळे निवडणूक केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना हवी असलेल्या मतदानाच्या बाबत कोणतीही मदत होत नसल्याने केंद्रांवर कमी प्रमाणात मतदान होत असून मतदारांना नाराजी पत्करून मतदान न करता घरी परतावे लागत आहे .
 याबाबत लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0