कळंबोली शासकीय वसाहतीत सर्रास गांजा विक्री :
सा.बा विभागाचा हात ?
कळंबोली : लढवय्या रोखठोककळंबोली शहरात सेक्टर ४ येथील असलेल्या शासकीय वसाहतीत चक्क गांजा विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला असून पोलिसांच्या विशेष पथकाने काल रात्री छापा टाकून
कारवाई केली आहे .
या प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग खतपाणी टाकत असून या प्रकरणात सा.बा अधिकाऱ्यांचा हात असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे .
या वासहतीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या शिवाय इतरांना राहण्यास परवानगी नसताना देखील भाडेतत्वावर येथील सदनिका भाड्याने देण्यात आलेल्या आहेत.
याबाबत लढवय्या रोखठोक ने "शासकीय सदनिकांचा गैरवापर " या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती, याबाबत अधीक्षक अभियंता राजेंद्र पाटील यांनी तात्काळ कारवाईचे फर्मान सोडले होते त्यानंतर शासकीय खुर्च्यांना चिकटून बसलेले भिंगारी विभागाचे अधिकारी यांनी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढून
या निवासस्थानावर भेटी दिल्या व त्यांना प्रत्येक्षात भाडोत्री राहत असल्याचे निदर्शनास आले मात्र तरी देखील थातूर मातूर दम देऊन तेथून पायकडून भींगारी कार्यालय गाठले या बातमीची गांभीर्याने दखल न घेतल्याने आज याच ठिकाणी बिल्डिंग क्र ५० रुम १/२ येथे चक्क गांज्यांची विक्री होत असल्याचा भांडा फोड पोलिसांच्या विशेष पथकाने केला आहे .
याबाबत पनवेल भिंगारी येथील अभियंता कार्यालयातील अधिकारी सतीश श्रावगे यांना दूरध्वनीहुन संपर्क केला असता त्यांच्याशी सोबत बोलणे झाले नाही . मात्र अधिक्षक अभियंता
पाटील यांनी याबाबत तत्काळ कारवाईचे संकेत दिले असून दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे .
या वसाहतीत असलेल्या रिकाम्या सदनिकांचा लेखा जोखा सा.बा विभागाला असून देखील या रिक्त सदनिकांमध्ये कोण वास्तव करीत आहे ? याची चौकशी करत नसल्याने भिंगारी सा.बा कार्यालय व कळंबोली डिव्हिजन येथील अधिकाऱ्यांचे या प्रकरणात आर्थिक लागे बंदे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .