शासकीय सदनिकांचा गैरवापर : दलाल मालामाल - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

शासकीय सदनिकांचा गैरवापर : दलाल मालामाल

शासकीय निवस्थानांची धर्मशाळा ?

  सदनिकांचा गैरवापर : दलाल मालामाल 


कळंबोली : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

  कळंबोली शहरात असलेली सेक्टर ४ ई या ठिकाणी असलेली शासकीय सदनिका भाड्याने देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकावर टिच्चून सध्या  दलालांमार्फत ही निवस्थाने भाड्याने दिली जात असल्याचा प्रकार खात्रीलायक सूत्रांकडून समोर आलेला आहे .
  या निवासस्थानात रात्रीस गलिच्छ गैरप्रकार होत असून
 या प्रकाराने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे .
  कळंबोली शहरातील सेक्टर ४ई या ठिकाणी असलेली शासकीय निवस्थाने सध्या शेवटच्या घटका मोजत आहेत , रात्रीच्या वेळेस या ठिकाणी गडद अंधारात हा परिसर हरवून जात आहे.
  येथे राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा ८ ते १० हजार रुपयांचे भत्ते कापून देखील शासनाचा फंड नसल्याने येथील विकास कामे होत नसल्याचे याआधी  अभियंते  सांगत आहेत शिवाय पडझड होत असलेल्या तक्रारीबाबत पत्रकारांनी अभियंता यांच्या कार्यालयात विचारले असता
   या इमारती पडल्या नंतर आम्हला कळवा अशा बेजबाबदार पनाच्या प्रतिक्रिया सार्वजनिक विभागाचे अधिकारी देत आहेत .
  याठिकाणी राहणाऱ्या मूळ शासकीय कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यास असमर्थ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता शासकीय निवस्थानाला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त करून दिल्याचे आरोप नागरिकांना कडून केले जात आहे .
    या शासकीय सोसायटीत राहणारे शासकीय कर्मचारी निवृत्त झाल्या नंतर त्यांना काही महिन्यात या ठिकाणाहून सदनिका रिक्त करण्याचा नियम आहेत सध्या ६० टक्के रहिवासी या वासहतीतून सदनिका सोडून बाहेर पडलेले आहेत मात्र येथील बऱ्याच ठिकाणी चक्क परप्रांतीय यांना २५ अनामत रक्कम घेऊन  दरमहा ७ ते ८ हजार भाडे घेत भाडोत्री ठेवले जात असल्याचे समोर येत आहे .
  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  संगनमताने हा प्रकार सुरू असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, याबाबत संबंधित प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून याठिकाणी राहत असलेल्या  सदनिका धारकांची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0