उरण मतदारसंघातून
विवेक पाटीलच : उमेदवारी घोषित.
उरण : लढाव्याया रोखठोक
उरण विभाग म्हणजे हुतात्म्यांचा बालेकिल्ला हुतात्म्यांना आदरांजली व्हायची असेल आणि मातीतल्या रक्ताला जागायचे असेल तर विवेक पाटील पुन्हा आमदार करणे गरजेचे आहे , असे उदगार माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांनी काढले .
जासई येथे शेकाप ,राष्ट्रवादी काँग्रेस, आघाडीच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील,पनवेल कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील,विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे,राविशेठ पाटील.डॉ आरिफ दाखवे,गणेश कडू,राजेश केणी,प्रियताई बबन मुकादम.डॉ हितेन शहा.आदी मान्यवर उपस्थित होते.
१९० उरण विधानसभा मतदारसंघाचे शेकाप आघाडी चे उमेदवार विवेक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले मी निवडणूक लढण्याच्या मनस्थितीत नव्हतो परंतु आपल्या अग्राहस्तव उभा राहत आहे. आपण गेली चाळीस वर्षे पक्षाची वाढ करीत आहोत. स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करणारा नेता मतदारांशी काय इमान राखणार . असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला
उरणाच्या आमदाराला निवडून दिल्यावर त्याने गेल्या पाच वर्षात काय केले ते आपण पाहिले आहे. या भागातील लोकांचे प्रश्न फक्त शेकापच सोडवू शकतो.ते पुढे म्हणाले आम्ही आंदोलने केली म्हणून येथील जनतेला साडेबारा टक्के मिळाले.