शेकापचा उमेदवार ठरला . नगरसेवक हरेश केणी आजमावणार नशीब - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

शेकापचा उमेदवार ठरला . नगरसेवक हरेश केणी आजमावणार नशीब

शेकापचा उमेदवार ठरला .

  नगरसेवक हरेश केणी  आजमावणार नशीब


पनवेल ( लढवय्या रोखठोक )


पनवेल विधानसभा निवडणुकीच्या व घटनस्थापणेच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षाने अधिकृत आपला उमेदवार जाहीर केलेला असून
 नगरसेवक हरेश केणी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे .
   पनवेल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात
आघाडीला उमेदवार सापडत नव्हता अखेर आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर उमेदवाराची  अधिकृत घोषणा करण्यात आलेली असून भाजपला कोणत्याही प्रकारे या विधानसभेत यश मिळू देणार नसल्याची शपथ पनवेल येथील आयोजित कार्यक्रमात घेण्यात आली आहे.
  यावेळी शेकापचे आमदार बाळाराम पाटील , जेष्ठ नेते जे एम म्हात्रे , नारायण घरत ,विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे , राजेंद्र पाटील , काशिनाथ पाटील , गणेश कडू यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
  शेवटच्या क्षणा पर्यंत प्रितम म्हात्रे विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा असताना
 हरेश केणी यांच्या उमेदवाराची घोषणा शेकापच्यावतीने करण्यात आली . 
   

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0