पनवेल मधून रविंद्र भगत विधानसभा लढवणार ? - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल मधून रविंद्र भगत विधानसभा लढवणार ?

पनवेल मधून रविंद्र भगत विधानसभा लढवणार ?

शेकापच्या गोटात  चर्चा : काशिनाथ पाटलांचा काढता पाय .


तळोजा : शैलेश चव्हाण


पनवेल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना पनवेल मधून काँग्रेस ,राष्ट्रवादी , शेकाप युतीचा उमेदवार निश्चित नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
 पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे हे उमेदवारी लढवतील अशी चर्चा होती मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रितम म्हात्रे हे स्वतः निवडणुकी रिंगणातून काढता पाय घेताना दिसून आल्याने यानंतर काँग्रेस , राष्ट्रवादी ,शेतकरी कामगार पक्ष युतीकडून विधानसभेसाठी पनवेल मधून उमेदवार कोण ?अशीच चर्चा असतानाच पनवेल महानगरपालिकेचे शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रवींद्र भगत यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे .
 रवींद्र भगत शेतकरी कामगार पक्ष कळंबोली परिसरातील कार्यतत्पर असे कार्यकर्ते व सामाजिक बांधीलकी असलेले सर्वसामान्य अशी त्यांची ओळख आहे .
 प्रितम म्हात्रे हे निवडणुकीत निवडणूक लढवत नाहीत हे लक्षात आल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील यांच्या देखील नावाची चर्चा होती मात्र लढवय्या रोखठोक यांच्यासोबत दूरध्वनीवरून झालेल्या संपर्क संपर्कात काशिनाथ पाटील यांनी सांगितले की उमेदवारी लढवण्यासाठी कार्यकर्ते माझ्या नावाची चर्चा करताहेत मात्र उमेदवार उभा करण्याची पूर्ण जबाबदारी पक्षाची असल्याने ही जबाबदारी मी का घेऊ ? याबाबत पक्षाने विचार करणे गरजेचे असल्याचे भावना त्यांनी बोलून दाखविल्या आहेत  .
 या चर्चेदरम्यान काशिनाथ पाटील यांनादेखील विधानसभा उमेदवारीत कोणताही रस नसल्याचे दिसून आले आहे त्यामुळे आता रवींद्र भगत यांच्या नावाची सुरू असलेली चर्चा यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे याबाबत शेतकरी कामगार पक्ष विधानसभेसाठी आपल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब कधी करणार याची उत्सुकता संपूर्ण विधानसभा क्षेत्र लागलेले आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0