नवीमुंबई परिवहन कर्मचारी वाऱ्यावर ; पनवेलात वाहकाला बेदम मारहाण
( अधिकाऱ्यांची जखमी वाहकाकडे पाठ ? )
लढवय्या रोखठोक : पनवेल
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात असणाऱ्या रोजंदारी व ठोक स्वरूपात काम करणाऱ्या चालक वाहक यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. दिवसागणिक येथील चालक व वाहकांना मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत मात्र याबाबत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम यांनी झोपेचे सोंग घेत या सर्व प्रकाराकडे कानाडोळा केल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे.
पनवेल ते कोपरखैरणे मार्ग क्रमांक ५० या मार्गावर काम करणारे चालक व वाहक कोपरखैरणे वरून पनवेल कडे येत असताना पनवेल जवळील गार्डन हॉटेल याठिकाणी सुट्ट्या पैशांच्या वादावरून एका प्रवाशाने वाहक रामेश्वर अशोक इपर वाहक क्रमांक ४०४९ याला बेदम मारहाण करत त्याला गंभीर जखमी केले आहे , या प्रकारानंतर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून गंभीर वाहक हा वाशी एमजीएम उपचार घेत आहे , दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इतक्या गंभीर स्वरूपात मारहाण झाल्यानंतर देखील या परिवहन सेवेला कोणतेही देणे-घेणे पडले नसल्याचे दिसून आले.
गंभीर स्वरूपात उपचार घेत असणाऱ्या रामेश्वर याची साधी विचारपूस देखील आगार व्यवस्थापक , परिवहन सभापती, व महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्यांनी केली नसल्याने रोजंदारी व ठोक कर्मचारी असलेल्या कर्मचाऱ्यांना बाबत यांची भावना आता स्पष्ट होत आहे केवळ दिवसाला या चालक-वाहकांना आपल्या दावणीला जुंपून मार्गावरून जास्तीत जास्त फेऱ्या मारून परिवहन सेवेच्या तिजोरीवर फक्त आर्थिक भर द्यावा या उद्देशाने त्यांना राबवून घेतले जात आहे , अशा खात्रीदायक बोलक्या प्रतिक्रिया परिवहन सेवेतील काही पदाधिकारी यांनी लढवय्या रोखठोकला दिल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील परिवहन सेवेतील लाईफ लाईन अशी एन एम एम टी ची ओळख आहे . ज्या परिवहनाचा डोलारा चालक व वाहक विशेषता (रोजंदारी व ठोक ) यांच्यावर उभा आहे .
या कर्मचाऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणातून होणाऱ्या मारहाणीला सामोरे जावे लागत आहे, मात्र याबाबत परिवहन व्यवस्थापक ,परिवहन सभापती, त्याचप्रमाणे महानगरपालिका कोणत्या प्रकारे याबाबत गंभीर पावले उचलत नसून बेजबाबदाररीने या प्रकाराकडे पाहत आहेत .
या परिवहन सेवेतील शेकडो रोजंदारी चालक-वाहक परिवहन सेवेच्या जाचाला देखील कंटाळलेले आहेत त्यांना कवडीमोल मिळणारे मानधन वर्षानुवर्षे तितकेच आहे, शिवाय भविष्यात त्यांनी परिवहन सेवेत टिकून राहावे यासाठी त्यांना कायम करण्याचे गाजर वेळोवेळी देऊन त्यांचे मानसिक छळ देखील परिवहन सेवेने चालवले असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर परिवहन कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0