झोमॅटो विरोधात कामगारांचे आंदोलन
ओरिअन मॉल बाहेर निदर्शने
पनवेल : प्रतिनिधी
झोमॅटो या फुड डिलिव्हरी एजन्सीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या शेकडो कामगारांनी आज बेमुदत बंद पुकारत आंदोलन केले .
झोमॅटो कडून प्रत्येक फूड ऑर्डर डिलिव्हरीकरण्या साठी याआधी ३५ रुपये देण्यात येत होते मात्र ही रक्कम ३५ रुपये वरून २५ रुपये करून झोमॅटोने गरीब कामगारांना विश्वासात न घेता त्यांच्यावर अन्याय केल्याने नवी मुंबई ते मुंबई दरम्यान कामगारांनी आज आंदोलनाची हाक दिली.पनवेल येथील ओरियन मॉल बाहेर देखील अशाच प्रकारे डिलिव्हरी कामगारांनी काम बंद आंदोलन करून त्याचा निषेध केला याबाबत आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे .